फेब्रुवारीत खातेधारकांची संख्या ४.१५ कोटी  ; २२ टक्के वाढ

जी वार्षिक आधारावर २१.८५ टक्क्यांची वाढ दर्शविते. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत व्यवस्थापनेतंर्गत एकूण पेशंन मालमत्ता ५,५९,५९४ कोटी रुपये होती. जी वर्षभरापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत ३३.०९ टक्के अधिक आहे.

    दिल्ली : राष्ट्रीय पेंशन योजना (एनपीएस) आणि अटल पेंशन योजना (एपीवाई) अंतर्गत फेब्रुवारीत खातेधारकांची संख्या २२ टक्के वाढून ४.१५ कोटी झाली. पीएफआरडीएने नुकतेच सांगितले की, फेब्रुवारी २०२० मध्ये विविध योजनांमध्ये खातेधाकांची संख्या ३४०.३४ लाख होती. ती फेब्रुवारी २०२१ मध्ये वाढून ४१४.७० लाख झाली आहे. जी वार्षिक आधारावर २१.८५ टक्क्यांची वाढ दर्शविते. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत व्यवस्थापनेतंर्गत एकूण पेशंन मालमत्ता ५,५९,५९४ कोटी रुपये होती. जी वर्षभरापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत ३३.०९ टक्के अधिक आहे.