ते चौघे एकाच बाईकवरून करत होते प्रवास; अचानक गाडीतून बाहेर आला साप आणि घोटाळा झाला, पाहा Shoking Video

सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ असून यात दिसतं, की एका दुचाकीवर चार लोकं बसून राईडसाठी (Two Wheeler Ride) निघाले आहेत. मात्र, काही वेळात त्यांच्यासोबत जे घडलं त्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुचाकीवर चारजण बसून चाललेले आहेत.

    नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडिया रातोरात एखाद्याला स्टारही बनवतं तर एखाद्याला टीकेचा धनीही. यातच काहीवेळा लोकांना खळखळून हसवणारे काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. तर, काही हैराण करणारे व्हिडिओही पाहायला मिळतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video Viral) आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूदेखील येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल.

    आजकाल चर्चेत येण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण प्रत्येकाला काहीतरी वेगळ्या आणि हटके कारणामुळे चर्चेत येण्याची इच्छा असते. असाच सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ असून यात दिसतं, की एका दुचाकीवर चार लोकं बसून राईडसाठी (Two Wheeler Ride) निघाले आहेत. मात्र, काही वेळात त्यांच्यासोबत जे घडलं त्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुचाकीवर चारजण बसून चाललेले आहेत. अचानक एक-एक करून हे सर्व जोरात खाली आपटतात. इतक्यात गाडीमधून एक मोठा साप बाहेर येतो. हे पाहून सगळे दूर धावू लागतात.

    व्हिडिओ पाहून तुमच्याही लक्षात आलं असेल की हे प्रकरण नेमकं काय आहे. सोबतच या चौघांची परिस्थिती काय झाली असेल याचाही तुम्ही अंदाज लावू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘jatt.life’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. तर, काही लोक हैराण झाले आहेत.

    4 men enjoying two wheeler ride and suddenly snake came out from bike watch video