terrorists

अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान (4 terrorists killed in anantnag)घालण्यात आले आहे.

    श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान (4 terrorists killed in anantnag)घालण्यात आले आहे. सिरहामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच त्या परिसरात सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली.

    पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने शालगुल जंगलात शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. मग लष्कराने केलेल्या गोळीबारात ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


    सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला सांगुनही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. अजूनही काही दहशतवादी लपून असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोळीबार अजूनहा सुरु आहे.