अलबद्रचे ४ दहशतवादी ताब्यात

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाने दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला. यादरम्यान अवंतीपोरा परिसरातून सैन्याने गुरुवारी दहशतवादी संघटना अल-बद्रसंबंधीत ४ दहशतवाद्यांना पकडले आहे. परिसरात सर्च ऑपरेशनदरम्यान सैन्याला हे यश मिळाले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाने दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला. यादरम्यान अवंतीपोरा परिसरातून सैन्याने गुरुवारी दहशतवादी संघटना अल-बद्रसंबंधीत ४ दहशतवाद्यांना पकडले आहे. परिसरात सर्च ऑपरेशनदरम्यान सैन्याला हे यश मिळाले. तसेच, बारामुलाचे दहशतवादी लपलेले असल्याची सूचना दिल्यावर सैन्य आणि पोलिस सर्च ऑपरेशन करत आहेत. याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर फायरिंग केली. सैन्य त्याचे सडेतोड उत्तर देत आहे.

हत्यार आणि दारूगोळा जप्त
पोलिसांनी सांगितले की, परिसरात दहशतवादी असल्याची सूचना मिळाल्यावर पोलिसांनी सीआरपीएफसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशनदरम्यान तिथे लपवून ठेवलेले हत्यार आणि दारूगोळा जमा केला. यामध्ये एक एके५६ रायफल, एक एके५६ मॅगजीन, २८ दारूगोळा आणि एक हँड ग्रेनेड आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख यावार अजीज दार, सज्जाद अहमद पार्रे, आबिद मजीद शेख आणि शौकत अहमद डार अशी आहे. अद्याप तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी अटक होऊ शकते.

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला
त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की बारामुल्लातील करीरी भागातील वाणीगम पाईन येथे दहशतवाद्यी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्य आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.