जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची खरी संख्या असू शकते दुप्पट,भारतात ४२ लाख लोकांच्या मृत्यूचा अंदाज

जगामध्ये कोरोनामुळे(Corona Death) मृत्यूची संख्या दुप्पट किंवा तिप्पट वाढण्याची शक्यता आहे.

  भारतात आत्तापर्यंत २,६९ कोटी लोक कोरोनामुळे(Corona) संक्रमित झाले आहेत. तसेच ३.०७ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननने अंदाज लावला आहे की, जगामध्ये कोरोनामुळे मृत्यूची संख्या दुप्पट किंवा तिप्पट वाढण्याची शक्यता आहे. भारतात कोरोना मृत्यूचे प्रमाण ऑफिशियली कमी असेल. खरी संख्या जास्त असू शकते.

  एमोरी युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिक कायोका शियोडा सांगतात की, भारतात हॉस्पिटलमध्ये जागा नाही. कोरोनामुळे अनेकांचा घरीच मृत्यू होत आहे.ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे.

  द न्यूयॉर्क टाईम्सने भारतातील मृत्यूच्या संख्येचा योग्य अंदाज लावण्यासाठी अनेक तज्ञांची मते जाणून घेतली. तज्ञांच्या मते सामान्य परिस्थितीमध्येही कोरोना संक्रमितांची आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सरकारी आकड्यांपेक्षा जास्त आहे. भारतातील सामान्य स्थिती,खराब स्थिती आणि अतिशय खराब स्थितीनुसार तज्ञांनी सगळी माहिती गोळा केली आहे.

  सामान्य स्थितीत कोरोना संक्रमणाचे जे आकडे आहेत त्यापेक्षा १५ टक्के संक्रमण वाढले.संक्रमणामुळे मृत्यूदरसुद्धा ०.१५ टक्के जास्त आहे. हे प्रमाण दुप्पट आहे. तज्ञांच्या मते देशात ४०.४२ कोटी लोक कोरोनाबाधित झाले. तेच६ लाख लोकांचा मृत्यू झाला.

  खराब स्थितीमध्ये एका रिपोर्टेड केसमुळे २० लोकांपर्यंत संक्रमण वाढले. मृत्यू दर ०.३० टक्के आहे.खराब परिस्थितीत भारतात कोरोना मृत्यूचे प्रमाण ५ टक्के जास्त आहेत. डॉ.रमनन लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले की,भारतात इन्फेक्शन आणि मृत्यूचे आकडे कमी मोजले गेले.एकूण ५०-६० कोटी लोकांच्या संक्रमणाची बाब समोर आली आहे.

  अतिशय खराब परिस्थितीत २६ टक्के जास्त संक्रमण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूण ४२ लाख लोकांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.