केंद्रीय मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार; पाहा संपूर्ण नावांची यादी

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वजण आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये काही नेते असे आहेत ज्यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते आणि त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

    नवी दिल्ली – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कॅबिनेट विस्तार अखेर दिल्लीत पार पडत आहे. आज संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कॅबिनेट विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेटच्या नव्या विस्तारात २७ ओबीसी आणि २० एससी-एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

    मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध SC समाजातील आहे. १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. २७ मंत्री OBC समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री शेड्यूल ट्राईब्स समाजातील आहेत.

    नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वजण आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये काही नेते असे आहेत ज्यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते आणि त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

    ही आहे ४३ मंत्र्यांच्या नावाची यादी