प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एप्रिल-जून 2020 च्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत सुधारणा झाली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या जुलै-सप्टेंबरच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत 48 टक्के घसरण झाली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या तिमाहीत 52.8 टन सोन्याची मागणी होती. स्थानिक बाजारात सोने प्रति तोळा 50 हजारांहून अधिक झाले होते. त्यामुळे कमी वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांकडे ग्राहक वळले आहेत. सप्टेंबरमध्ये पितृपक्ष आणि अधिकमास असल्याने सोन्याच्या खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे जागतिक सोने परिषदेने म्हटले आहे. तसेच सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि टाळेबंदीचाही सोने खरेदीवर परिणाम झाल्याचे डब्ल्यूसीजीने म्हटले आहे.

हैदराबाद (Hyderabad). एप्रिल-जून 2020 च्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत सुधारणा झाली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या जुलै-सप्टेंबरच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत 48 टक्के घसरण झाली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या तिमाहीत 52.8 टन सोन्याची मागणी होती. स्थानिक बाजारात सोने प्रति तोळा 50 हजारांहून अधिक झाले होते. त्यामुळे कमी वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांकडे ग्राहक वळले आहेत. सप्टेंबरमध्ये पितृपक्ष आणि अधिकमास असल्याने सोन्याच्या खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे जागतिक सोने परिषदेने म्हटले आहे. तसेच सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि टाळेबंदीचाही सोने खरेदीवर परिणाम झाल्याचे डब्ल्यूसीजीने म्हटले आहे.

सोने दागिने गहाण ठेवण्याच्या प्रमाणात वाढ
सोन्याच्या किमती वाढत असल्या तरी सोने तारण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमी झाली आहे तर दुसरीकडे सोन्याच्या दागिन्यांचा कर्जासाठी वापर वाढला आहे.

ग्राहकांच्या विश्वास निर्देशांकात घसरण
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 24 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेमधील आजपर्यंतच्या सर्वांत मोठ्या घसरणीपैकी आहे. ग्राहकांची मागणी कमी झाल्याने ग्राहकांचा विश्वास कमी झाल्याचेही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणात दिसून आले. आरबीआयच्या सर्वेक्षणानुसार जुलैमध्ये ग्राहकांचा विश्वास निर्देशांक हा 53.8 तर सप्टेंबरमध्ये 49.9 राहिला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त
मुंबई. कोरोनाची साथ पुन्हा वाढू लागल्याने भांडवली बाजार आणि कमॉडिटी बाजारात पडसाद उमटू लागले आहेत. सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात 43 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 50,452 रुपये आहे. चांदीच्या भावात एक किलोमागे 116 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 60254 रुपये आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि कोरोनाची दुसरी लाट यामुळे सोने आणि चांदीमध्ये बुधवारी मोठी घसरण झाली. देशांतर्गत बाजारात सोने 450 रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदीच्या दरात 2080 रुपयांची घसरण झाली होती. गुरुवारी मात्र दोन्ही धातू काही प्रमाणात सावरले.