५० टक्के भारतीय घालतं नाहीत मास्क, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिषदेद्वारे एक चिंता व्यक्त करण्यात आली ती म्हणजे भारतात ५० टक्के लोकं मास्क घालत नाही आहेत. फक्त ७ टक्के लोकं व्यवस्थितरित्या मास्क घालत आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २५ शहरांमध्ये अभ्यास केला आहे.

    देशात आतापर्यंत २ कोटी ५७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २ लाख ८७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी २३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३२ लाख ३३ हजारांहून अधिक जणांवर अद्याप उपचार सुरू आहे.

    दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिषदेद्वारे एक चिंता व्यक्त करण्यात आली ती म्हणजे भारतात ५० टक्के लोकं मास्क घालत नाही आहेत. फक्त ७ टक्के लोकं व्यवस्थितरित्या मास्क घालत आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २५ शहरांमध्ये अभ्यास केला आहे.

    केलेल्या अभ्यासातून असे समोर आले की, ६४ टक्के लोकं तोंड झाकून घेतात पण नाक नाही. २० टक्के लोकांचा मास्क अनुवटीवर असतो. तर २ टक्के लोकांचा मास्क मानेवर असतो आणि १४ टक्के लोकं व्यवस्थित मास्क घालत आहेत.