प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

श्रीलंकेच्या नौदलाने(shri lanka navy) ५४ भारतीय मच्छिमारांना( Indian fishermen arrested) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच त्यांनी पाच मासे पकडण्याच्या बोटीही जप्त केल्या आहेत.

    कोलंबो: श्रीलंकेच्या नौदलाने(shri lanka navy) ५४ भारतीय मच्छिमारांना(fishermen arrested) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच त्यांनी पाच मासे पकडण्याच्या बोटीही जप्त केल्या आहेत. हे मच्छिमार श्रीलंकेच्या समुद्री हद्दीत गेल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.

    बुधवारी श्रीलंकेच्या उत्तर आणि ईशान्य भागातून या मच्छिमारांना अटक करण्यात आली. बाहेरील देशातील मच्छिमार आपल्या हद्दीत येत असल्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे श्रीलंकेचे नौदल नियमितपणे गस्त घालत असते, अशी माहिती श्रीलंकेने दिली. जाफ्फनाच्या कोविलन समुद्रकिनाऱ्यापासून ३ समुद्री मैलांवरून एक भारतीय मच्छिमार नौका ताब्यात घेण्यात आली. या बोटीवरून १४ लोकांना अटक करण्यात आली. तसेच, पेसालाई, मन्नार आणि इरानातिवू बेटावरून काही समुद्री मैलांवर असणाऱ्या दोन बोटी ताब्यात घेण्यात आल्या. या बोटींवर प्रत्येकी २० भारतीय होते, अशी माहिती देण्यात आली.