देशभरात २४ तासांत ६३ हजार ४८९ नवे कोरोनाबाधित रूग्ण

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील २५ लाख ८९ हजार ६८२ कोरोनाबाधितांमध्ये ६ लाख ७७ हजार ४४४ रूग्ण सक्रिय आहेत. तसेच १८ लाख ६२ हजार २५८ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४९ हजार ९८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ६३ हजार ४८९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील २५ लाख ८९ हजार ६८२ कोरोनाबाधितांमध्ये ६ लाख ७७ हजार ४४४ रूग्ण सक्रिय आहेत. तसेच १८ लाख ६२ हजार २५८ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४९ हजार ९८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   

१५ ऑगस्टपर्यंत देशात एकूण २,९३,०९,७०३ नमूने तपासले गेले असून, यातील ७ लाख ४६ हजार ६०८ नमूने काल तपासल्या गेले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या कोरोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे भारतात सुद्धा तीन लसी चाचण्यांच्या विविध टप्प्यांत आहेत. त्यामुळे या लसी वापरासाठी योग्य असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिल्यावर लगेचच त्यांचे व्यापक उत्पादन होणार आहे.