परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकार ६४ विमानांचे उड्डाण करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: भारत सरकार लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या १४,८००० भारतीयांना मायदेशात आणणार आहे. त्यासाठी ७ मे ते १३ मे पर्यंत ६४ विमानांच्या उड्डाणाची तयारी करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने

 नवी दिल्ली: भारत सरकार लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या १४,८००० भारतीयांना मायदेशात आणणार आहे. त्यासाठी ७ मे ते १३ मे पर्यंत ६४ विमानांच्या उड्डाणाची तयारी करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांचा वापर या विशेष कामासाठी करण्यात येणार आहे. भारत एकूण १२ देशांमध्ये अडकलेल्यांना मायदेशी परत आणणार आहे. युएई, ब्रिटेन, अमेरिका, कतार, सौदी अरब, सिंगापूर, मलेशिया, फिलीपीन्स, बांग्लादेश, बहरीन कुवैत आणि ओमान या ठिकाणच्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताचे हे ६४ विमानांचे उड्डाण असणार आहे.

भारत ७ मे पासून टप्प्याटप्प्याने विमान आणि नौसेनेच्या जहाजांच्या माध्यमातून भारतीयांना परदेशातून परत आणणार आहे. ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही त्यांना भारतात परत आणणार असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारत ७ ते १३ मे दरम्यान युएईसाठी १०, अमेरिका आणि ब्रिटेनसाठी प्रत्येकी ७, सौदी अरबसाठी ५, सिंगापूरसाठी ५ , कतारसाठी २ विमानांच्या उड्डाणांची योजना आखण्याची शक्यता आहे. बांग्लादेश आणि मलेशियासाठी प्रत्येकी ७ विमानांचे उड्डाण होऊ शकते. तसेच कुवेतसाठी ५ आणि फिलीपीन्ससाठी ५ विमानांचे उड्डाण होऊ शकते, असा अंदाज आहे. याशिवाय ओमान आणि बहरीनसाठी प्रत्येकी २ विमानांच्या उड्डाणाची तयारी होऊ शकते. केरळ, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा  इत्यादी राज्यांमधून या विशेष ६४ विमानांचे उड्डाण होऊ शकते. १३ मे नंतर आणखी काही उड्डाणांचेही नियोजन होऊ शकते.