रुग्णांची सेवा करताना गमावले प्राण,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘इतक्या’ डॉक्टर्सचा देशभरात झाला मृत्यू

दुसऱ्या लाटेत(Corona Second Wave) कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला होता. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत होता.  डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सेवा करत होते.

    देशात कोरोनाची दुसरी लाट(Corona Second Wave) ओसरत असली तरी मृतांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६४६ डॉक्टरांनी(646 Doctors Died due to corona) जीव गमवला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं ही माहिती दिली आहे.

    देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांवर उपाचार करणाऱ्या ६४६ डॉक्टरांचा रुग्णांची सेवा करताना मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक डॉ़क्टरांचे मृत्यू हे दिल्लीत झाले आहे. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांत करोना रुग्णांची सेवा करताना डॉक्टराना प्राणाला मुकावं लागत आहे.

    दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला होता. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत होता.  डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सेवा करत होते.

    कोणत्या राज्यामध्ये किती मृत्यू ?

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीत १०९, बिहारमध्ये ९७, उत्तर प्रदेशात ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्र प्रदेशमध्ये ३५, तेलंगणा ३४, तामिळनाडूत ३२, पश्चिम बंगालमध्ये ३०,महाराष्ट्रमध्ये २३, ओडिशामध्ये २३, मध्य प्रदेशात १६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.