भारतातील कंपन्यांचे ऑफिस कल्चरला झुकते माप,७० टक्के कंपन्या ‘Work From Home’ साठी अनुत्सुक

‘वर्क फ्रॉम होम’साठी(work from home) भारतातील कंपन्या(Indian companies against work from home) विरोधात असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जॉब साइट इनडीडच्या सर्वेक्षणानुसार ६७ टक्के मोठ्या आणि ७० टक्के मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्या कोरोना(corona) महामारीनंतर ‘वर्क फ्रॉम होम’साठी उत्सुक नसल्याचे समोर आले आहे.

    कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमचे(work from home) प्रमाण वाढले. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली. मात्र ‘वर्क फ्रॉम होम’साठी भारतातील कंपन्या विरोधात असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जॉब साइट इनडीडच्या सर्वेक्षणानुसार ६७ टक्के मोठ्या आणि ७० टक्के मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्या कोरोना महामारीनंतर ‘वर्क फ्रॉम होम’साठी उत्सुक नसल्याचे समोर आले आहे.

    तसेच डिजिटल स्टार्टअप कंपन्यांनी देखील वर्क फ्रॉम होम कल्चरपेक्षा ऑफीस कल्चरच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. तब्बल ९० टक्के कंपन्या कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा ऑफीस कल्चर सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. महामारीनंतर वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विरोधात असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.

    ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचारी दुरावले गेल्यानं कंपन्यांना आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागला. कर्मचाऱ्यांच्या उत्पादकता अनुकूल ठेवण्यासाठी ऑफीस कल्चर उपयुक्त असल्याचं कंपन्यांच म्हणणं आहे. यात ५० टक्के कर्मचारी देखील कामासाठी आपलं मूळ शहर सोडून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी तयार असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं आहे.