Corona Virus

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहचली आहे. तर ९ लाख ७५ हजार ८६१ अॅक्टिव्ह रुग्ण (active cases) आढळले असून ४४ लाख ९७ हजार ८६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८८ हजार ९३५ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत (Corona patients)  झपाटयाने वाढ होत आहे. तसेच काल दिवसभरात देशात ७५ हजार ८३ नव्या रूग्णांची ( new cases) नोंद करण्यात आली आहे. तसेच मागील चोवीस तासांमध्ये १ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू (deaths) झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ५५ लाखांचा टप्पा देखील (crosses 55-lakh mark ) ओलांडला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहचली आहे. तर ९ लाख ७५ हजार ८६१ अॅक्टिव्ह रुग्ण (active cases) आढळले असून ४४ लाख ९७ हजार ८६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८८ हजार ९३५ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

दरम्यान, जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण झालेली चिंतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांत ९०,००० रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. देशाची मृत्यूदर संख्या सुद्धा कमी आहे.