Antibodies in patients

नवीन रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ इतकी झाली आहे. तसेच ८ लाख १५ हजार ५३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २९ लाख ७० ४९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज गुरूवारी सर्वाधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण (new positive cases) आढळून आले आहेत. तर आज १ हजार ४३ रुग्णांचा मृत्यू (deaths ) झाला आहे. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, नवीन रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ इतकी झाली आहे. तसेच ८ लाख १५ हजार ५३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २९ लाख ७० ४९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांचा आकडा ६७ हजार ३७६ इतका झाला आहे. दरम्यान, अमेरिका-ब्राझील या देशांपेक्षा भारतात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. अमेरिका-ब्राझीलमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.