Korona aakadewari
कोरोना विषाणूचा कहर

नवी दिल्ली: देशात कोरोना रूग्णांचा (Corona Virus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना विषाणूच्या ८३ हजार ८०९ नव्या रुग्णांची नोंद (83,809 new cases & 1,054 deaths in last 24 hours) झाली. तर उपचार सुरु असलेल्या १ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९ लाखांच्या वर (crosses 49-lakh mark)  जाऊन पोहोचला आहे.

देशात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९ लाख ३० हजार २३७ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९ लाख ९० हजार ०६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु (active cases) आहेत. तर ३८ लाख ५९ हजार ४०० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ८० हजार ७७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी संसदेत देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असल्याचा दावा केला होता. तसेच कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत असल्याचे त्यांनी म्हटले होते.