देशात गेल्या २४ तासांत ८४८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६० हजार ९७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८४८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशात २४ लाख ४ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७ लाख ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे देशात आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ६० हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण आढळले असून ८४८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर ७५ टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे ही सकारात्मतेची बाब आहे. मात्र, देशातील एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ३१ लाखांच्या वर गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६० हजार ९७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८४८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशात २४ लाख ४ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७ लाख ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे देशात आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

२४ ऑगस्ट २०२० पर्यंत देशात ३ कोटी ६८ लाख २७ हजार ५२० कोरोना चाचण्या घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. देशात कोरोना चाचणीची संख्या वाढल्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि इतर राज्यांत सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.