corona cases

गेल्या २४ तासांत देशात  ९६ हजार ४२४ कोरोनाबाधित रुग्ण (new cases) आढळले आहेत. तर देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा (crosses 52-lakh mark) टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार १७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या (COVID-19) संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात  ९६ हजार ४२४ कोरोनाबाधित रुग्ण (new cases) आढळले आहेत. तर देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा (crosses 52-lakh mark) टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार १७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ५२ लाख १४ हजार ६७८ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये १० लाख १७ हजार ७५४ अॅक्टिव्ह केसेस (active cases) असून ४१ लाख १२ हजार ५५२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत ८४ हजार ३७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना इतका गंभीर संसर्ग आहे की फक्त सहा देशांत जगातील ६० टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, भारत, ब्रिटन, इटली या देशांचा समावेश आहे. तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको आणि भारतामध्ये ७० हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात गुरुवारी २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले. राज्यात आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे.