randeep surjewala

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला(randeep surjewala) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. राहुल गांधी(rahul gandhi) काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत असं माझ्यासह ९९.९ टक्के काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस(congress) पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवली होती.  सध्या काँग्रेसच्या भावी अध्यक्षांच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आधी राहुल गांधी यांचे नाव समोर येत होते, मात्र आता प्रियंका गांधींचे नावही चर्चेत आले आहे. अशातच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला(randeep surjewala) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. राहुल गांधी(rahul gandhi) काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत असं माझ्यासह ९९.९ टक्के काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

या घडामोडींनंतर पक्षातील हत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज १० जनपथ येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी लवकरच निवड प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसचे इलेक्ट्रोल कॉलेज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य हे या पदासाठी जो योग्य आहे त्याची निवड करतील, असं सुरजेवाला यांनी म्हटले आहे.