जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध होणार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    देशात केरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे.

    मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.