सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, 12 वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या सविस्तर

ऑइल इंडियाच्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ सहाय्यक पद भरती 2021 साठी 15 ऑगस्टपर्यंत कंपनीच्या ऑइल इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकता.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना नवीन नोकऱ्या मिळणंही कठीण होत आहे. अशावेळी सरकारी पातळीवर राबवण्यात येत असलेल्या नोकरभरती मोहिमेमुळे आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. सध्या पदवीधर नसलेल्या तरुणांसाठीदेखील एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

    देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऑईल इंडिया लिमिटेडने कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम-कॉम्प्युटर ऑपरेटर-Clark cum Computer Operator) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 120 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. ऑइल इंडियाच्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ सहाय्यक पद भरती 2021 साठी 15 ऑगस्टपर्यंत कंपनीच्या ऑइल इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात.

    शैक्षणिक पात्रता –

    कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 40 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावं लागणार आहे. त्यासह किमान सहा महिन्यांचा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणं आवश्यक आहे. तसेचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच संगणकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी 50 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. मात्र अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट 40 टक्के आहे.

    सीबीटी अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये एकूण तीन भाग आहेत. इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान, रिझनिंग, गणित संख्यात्मक आणि मानसिक क्षमता, तांत्रिक ज्ञान अशा विषयांचा यात समावेश असतो. इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान हा एक भाग असतो, तर रिझनिंग, गणित, आणि मानसिक क्षमता हा एक विभाग असतो. या दोन्ही विभागात प्रत्येकी 20 टक्के प्रश्न येतात तर 60 टक्के प्रश्न तांत्रिक ज्ञानावर अर्थात टेक्निकल नॉलेजवर आधारीत असतात. एमसीक्यू म्हणजे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स पद्धतीने ही परीक्षा होते. यात निगेटीव्ह मार्किंग नसतं. इंग्लिश आणि उमेदवाराची प्रादेशिक भाषा अशा दोन्ही भाषेत हे प्रश्न उपलब्ध असतात