फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

हा व्हिडिओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ही व्यक्ती रस्त्याच्या कडेला डोसा कसा बनवत आहे आणि ती वेगाने प्लेट डोशावर ओवाळून तीच पुढे सरकवून लोकांना सर्व्ह करत आहे. प्लेट सरकवतानाचं या व्यक्तीचं जे कौशल्य आहे ते वाखाणण्याजोगं आहे.

    रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे (Street Food) अनेक मजेदार व्हिडिओ (viral videos) तुम्ही पाहिले असतील. अनेक लोक ज्या पद्धतीने स्वयंपाक (cooking) करतात ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही तर नवलच. पण आजकाल सोशल मीडियावर (social media) ग्राहकांना डोसा देण्याची अनोखी पद्धत (a person unique style to serves dosa) पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्राही या काकांच्या प्रेमात पडले आहेत.

    डोसा वाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे. स्ट्रीट फूडमध्ये दुकानदार आपल्या ग्राहकांना अनोख्या पद्धतीने अन्न सर्व्ह करतात. पण डोसा ओवाळून डोसा देण्याच्या काकांच्या या पद्धतीने त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत.

    हा व्हिडिओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ही व्यक्ती रस्त्याच्या कडेला डोसा कसा बनवत आहे आणि ती वेगाने प्लेट डोशावर ओवाळून तीच पुढे सरकवून लोकांना सर्व्ह करत आहे. प्लेट सरकवतानाचं या व्यक्तीचं जे कौशल्य आहे ते वाखाणण्याजोगं आहे. ज्या परिपूर्णतेने ते डोसा देत आहे, त्यांचा साथीदारही त्याच वेगाने ती प्लेट पकडत आहे.

    हा व्हिडिओ बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ही व्यक्ती रोबोटसारखी वागत आहे आणि हे पाहून मलाही भूक लागली आहे. हा व्हिडिओ पाहून लोकं वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.