या रणरागिणीला कडक सॅल्यूट! गळ्यात स्टेथोस्कोप अन हातात बंदुक , कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास

कॅप्टन दीपशिखा यांनी सिक्कीमच्या मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. कॅप्टन दीपशिखा आता पुढील आठ महिने फ्रंटलाइनवर ड्युटी करणार आहे. सैन्यात डॉक्टरकीची सेवा देत सीमेवर हातात बंदुक घेत सेवा देणाऱ्या दीपशिखा देशातील युवापिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

    भारतीय लष्करात आता महिलांचा डंका वाजणार आहे.लष्करात महिला अधिकाऱ्यांचीही स्थायी स्वरुपात नियुक्ती केली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी भारतीय लष्करानं जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांना तैनात करुन इतिहास रचला होता. आता भारतीय सैन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लष्करानं कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

    कोण आहेत दीपशिखा छेत्री
    कॅप्टन दीपशिखा छेत्री मूळच्या सिक्कीम येथील रहिवासी असून त्या राज्याच्या दुसऱ्या महिला लष्करी अधिकारी आहेत. विशेष म्हणजे डॉ. दीपशिखा यांना लष्कराच्या वैद्यकीय परीक्षेत देशात सहावा क्रमांक मिळाला होता. तर सैन्याच्या वैद्यकीय परीक्षेत समाविष्ट असलेल्या महिला उमेदवारांमध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. सैन्यात डॉक्टरकीची सेवा देत सीमेवर दहशतवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी सज्ज असणाऱ्या दीपशिखा यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांसाठी व संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. काही दिवसांपूर्वी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपशिखा यांचं कौतुक केलं होतं. कॅप्टन दीपशिखा यांचे वडील राजेंद्र छेत्री आणि आई बिंदु छेत्री यांना आपल्या मुलीच्या कामगिरीवर खूप अभिमान आहे. कॅप्टन दीपशिखा यांनी सिक्कीमच्या मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. कॅप्टन दीपशिखा आता पुढील आठ महिने फ्रंटलाइनवर ड्युटी करणार आहे. सैन्यात डॉक्टरकीची सेवा देत सीमेवर हातात बंदुक घेत सेवा देणाऱ्या दीपशिखा देशातील युवापिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.