ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि मध्य प्रदेशला एकूण ५१० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

हरियाणा सरकारनेही रेल्वेला ऑक्सिजन एक्सप्रेस पाठवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार, सध्या फरीदाबाद इथे गाडीवर टँकर्स चढवण्याचे काम सुरु असून, त्यात द्रवरूप ऑक्सिजन भरण्यासाठी ते राउरकेला इथे पाठवले जाणार आहे. आतापर्यंतच्या नियोजनानुसार, प्रत्येकी पाच ऑक्सिजन टँकर्सची क्षमता असलेल्या दोन ऑक्सिजन एक्सप्रेस हरियाणाला पाठवल्या जाणार आहेत.

  • हरियाणासाठीची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेसही लवकरच पोचणार, पाच रिकामे कंटेनर घेऊन गाडी फरीदाबादहून राउरकेलाकडे रवाना
  • ऑक्सिजन एक्सप्रेसमधून मध्यप्रदेशसाठी पहिले ऑक्सिजन टँकर्स पोचले

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आपला प्रवास भारतीय रेल्वेने सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यांना एकूण ५१० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे.

हरियाणा सरकारनेही रेल्वेला ऑक्सिजन एक्सप्रेस पाठवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार, सध्या फरीदाबाद इथे गाडीवर टँकर्स चढवण्याचे काम सुरु असून, त्यात द्रवरूप ऑक्सिजन भरण्यासाठी ते राउरकेला इथे पाठवले जाणार आहे. आतापर्यंतच्या नियोजनानुसार, प्रत्येकी पाच ऑक्सिजन टँकर्सची क्षमता असलेल्या दोन ऑक्सिजन एक्सप्रेस हरियाणाला पाठवल्या जाणार आहेत.

मध्यप्रदेशातही, ६४ मेट्रिक टन पेक्षा अधिक ऑक्सिजन असलेली पहिली एक्सप्रेस काल पहाटे पोचली. जबलपूर (१), भोपाळ(२) आणि सागर (३) या ठिकाणी हे सहा टँकर्स उतरवण्यात आले.

चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस लखनऊसाठी प्रवास करत असून तीन टँकर्ससह ही गाडी कालच लखनऊला पोहोचली आहे. आणखी एक ट्रेन रिकामे सहा टँकर्स घेऊन लखनऊहून बोकारो साठी रवाना झाली असून ती देखील उत्तरप्रदेशासाठी ऑक्सिजन घेऊन येणार आहे. ऑक्सिजनच्या सातत्यपूर्ण पुरवठ्यातून, उत्तरप्रदेशच्या रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, अशी व्यवस्था केली जात आहे.

आतापर्यंत, भारतीय रेल्वेने २०२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा उत्तर प्रदेशाला केला आहे, तर महाराष्ट्राला १७४ मेट्रिक टन, दिल्लीला ७० आणि मध्यप्रदेशला ६४ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे.