एका व्हिडिओ क्लिपमुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये भूकंप, राहुल गांधींचे नीकटवर्तीय प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार वादाच्या भोवऱ्यात, तर काँग्रेस माध्यम समन्वयकाची हकालपट्टी

उगरप्पा यांनी सारवासराव करताना संगितले की, सलीम हे भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आरोपांची माहिती देत होते. शिवकुमार हे काही जणांकडून पैसे घेतात, असे काही जण सांगत असल्याची माहिती सलीम देत असल्याचा दावा उगरप्पा यांनी केला आहे.या वादग्रस्त पत्रकार परिषदेनंतर सलीम यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

  बंगळुरु :  एका व्हिडिओ क्लिपने कर्नाटक काँग्रेसमध्ये वादळ निर्माण केलं आहे. भर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी खासदार वीएस उगरप्पा आणि प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक एमए सलीम अहमद यांच्यातील गुजगोष्टींचा हा व्हिडिओ काँग्रेसला अडचणीचा ठरला आहे. हे दोघेही प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत एकमेकांशी बोलत असताना ते कॅमेरात रेकॉर्ड झाले आहे. दोघेही हळू आवाजात एकमेकांशी कानात बोलत असले, तरी समोर ठेवलेल्या माईकमुळे या दोघांची बातचित कॅमेरात रेकॉर्ड झाल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. त्यांच्यातील बातचितीचा हा व्हिडिओ भाजपा आयटी सेलचे हेड अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वादाला तोंड फुटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार लाच घेतात आणि त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने ५० ते १०० कोटींची कमाई कशी केली आहे, हे दोन्ही नेत्यांचं संभाषण असल्याचे मालविय यांनी लिहिले आहे. शिवकुमार यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरही या दोन्ही नेत्यांनी टीका केली आहे.

   

  व्हिडिओत नेमके काय?
  प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक सलीम म्हणतात की शिवकुमार फक्त वसुली करणारे नेते आहेत. पहिले कमीशन ६ ते ८ टक्के होते, शिवकुमार आल्यापासून ते आता वाढून १२ टक्के करण्यात आले आहे. ही सगली डीके यांची एजसेटमेंट आहे, हा क घोटाळा आहे. त्यांच्या सहकाऱ्याने ५०-१०० कोटी रुपये कमवले आहेत. म्हणजे विचार करा डीकेंनी किती कमावले असतील.(अद्याप या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही)

  माध्यम समन्वयक सहा वर्षांसाठी निलंबित
  हे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसने सारवासारव केली आहे. काँग्रेस भ्रष्टाचाराचे समर्थन करीत नसल्याचे उगरप्पा यांनी म्हटले आहे. डी के शिवकुमार हे खूप चांगले नेते असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी व्यापारातून पैसे मिळवले आहेत. त्यांच्यावरील आरोप चुकीच्या ठिकाणी केल्याचा ठपका ठेवत सलीम यांच्याविरोओधात कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने वेस उगरप्पा यांनाही कारणे दाखवा नोटीस दिली आहे. एमए सलीम यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीएस सिवकुमार यांनी प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितले, मात्र अनुशासन समिती योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

  उगरप्पा यांनी सारवासराव करताना संगितले की, सलीम हे भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आरोपांची माहिती देत होते. शिवकुमार हे काही जणांकडून पैसे घेतात, असे काही जण सांगत असल्याची माहिती सलीम देत असल्याचा दावा उगरप्पा यांनी केला आहे.या वादग्रस्त पत्रकार परिषदेनंतर सलीम यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाच्या आरोपांची माहिती ते आपल्याला देत असल्याचे उगरप्पा यांचे म्हणणे आहे.
  राहुल यांचे निकटवर्तीय आहेत शिवकुमार. डी के शिवकुमार यांनी नुकतेच राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांनीच काँग्रेस पक्ष सांभाळावा, यासाठी ते आग्रही आहेत.