जेईई आणि नीट परीक्षा वेळापत्रकानुसारच : एनटीए

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट (NEET) परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. ही परीक्षा देण्यासाठी एकूण १५.९७ लाख नोंदणीकृत परीक्षार्थी यावर्षी आहेत. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी नीट २०२०ची परीक्षाकेंद्रे २५४६ वरून ३८४३ वर नेण्यात आली आहेत. तसेच नीट २०२० ची प्रवेशपत्रे एनटीए नीटचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in इथे (admit cards available on official website) मिळतील.

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) २०२० ची जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या पूर्वीच्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्याचसोबतच एनटीएने लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्याचे आश्वासनही दिले आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना पहिलेच केंद्र देण्याचा ९९ टक्के प्रयत्न करण्यात येईल, असे एनटीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार स्पष्ट केले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. ही परीक्षा देण्यासाठी एकूण १५.९७ लाख नोंदणीकृत परीक्षार्थी यावर्षी आहेत. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी नीट २०२०ची परीक्षाकेंद्रे २५४६ वरून ३८४३ वर नेण्यात आली आहेत. तसेच नीट २०२० ची प्रवेशपत्रे एनटीए नीटचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in इथे (admit cards available on official website) मिळतील. तसेच यावर्षी कोरोना संकटाच्या काळात परीक्षा घेण्यासाठी एजन्सीकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.