Account for donations for Ram Mandir says Bhupesh Baghel
राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांचा हिशेब द्या : भूपेश बघेल

उल्लेखनीय आहे की, भाजपा आमदार बृजमोहन अग्रवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी राज्य सरकारने १०१ कोटी रुपये दान द्यावे, अशी मागणी केली होती.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, रायपूर.

भाजपाने अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा केलेल्या देणग्यांचा हिशेब द्यावा, अशी मागणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. बघेल म्हणाले की, भाजपाने सर्वप्रथम त्या रकमेचा हिशेब द्यावा, जी रक्कम त्यांनी राम मंदिराचे ‘शिळा पूजन’ अर्थात शिलान्यास समारंभानंतर देणग्याच्या रूपात गोळा केली होती. उल्लेखनीय आहे की, भाजपा आमदार बृजमोहन अग्रवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी राज्य सरकारने १०१ कोटी रुपये दान द्यावे, अशी मागणी केली होती.

अग्रवाल यांच्या या मागणीवरून बघेल यांना प्रश्न विचारण्यात आला असता, भाजपाने सर्वप्रथम राम मंदिरासाठी गोळा केलेल्या देणग्यांचा हिशेब द्यावा, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, बघेल यांच्या प्रत्युत्तरानंतर अग्रवाल यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर पलटवार केला. अग्रवाल म्हणाले की, काँग्रेस नेत्यांना आम्हाला हिशेब मागण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी राम मंदिर निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारचे योगदान दिले नाही.