‘ममताच बंगालची दुर्गा’, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, मोदी- शहांविरोधात उमटतायत मजेशीर प्रतिक्रिया, ट्वीट व्हायरल!

एकटीने करुन दाखवलं, मोदी शहांना कसं हरवावं हे ममतांनी दाखवून दिलं अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटताना दिसत आहेत.

    पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येत आहेत. ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असं असलं तरी भाजपानेही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दमदार कामगिरी केली आहे. चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर ट्विटरवरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे. पश्चिम बंगाल हा दुर्गेची पुजा करणार आहे, एकटीने करुन दाखवलं, मोदी शहांना कसं हरवावं हे ममतांनी दाखवून दिलं अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटताना दिसत आहेत.