#Change – आरोग्यमंत्री बदलल्यावर राहुल गांधींना पडलाय ‘हा’ प्रश्न, म्हणाले…

देशात कोरोना काळात डॉ. हर्ष वर्धन(Dr. Harsh Vardhan) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लसीच्या तुटवड्यामुळे(Vaccine Shortage) त्यांना लोकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागला. दरम्यान, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी(Question By Rahu Gandhi) सवाल केला आहे.

    दिल्लीः मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार(Cabinet Expansion) काल पार पडला.  अनेक मंत्र्याना डच्चू देण्यात आला. डॉ. हर्ष वर्धन यांना केंद्रीय आरोग्यमंत्रीपदावरून (Health Minister) काढून टाकण्यात आले. दरम्यान,मनसुख मंडाविया यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे.

    देशात कोरोना काळात डॉ. हर्ष वर्धन(Dr. Harsh Vardhan) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लसीच्या तुटवड्यामुळे(Vaccine Shortage) त्यांना लोकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागला. दरम्यान, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी(Question By Rahu Gandhi) सवाल केला आहे.

    राहुल गांधी ट्विट करत सवाल विचारला आहे. “याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही?.” यासोबत राहुल गांधींनी ‘चेंज’ असा हॅशटॅग दिला आहे.

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ‘बेजबाबदार’ आहेत आणि कोणत्याही कारणाशिवाय टीका करतात, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींवर पलटवार केला.

    देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी ५०० पेक्षा ही कमी होती. मात्र अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५,८९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.