hair care tips for holi

होळी,(holi) ईद, शब-ए-बारात आणि ईस्टरला होणारी गर्दी रोखण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध (restrictions for holi)लादण्याची सूचना केंद्राने केली आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या(corona) वाढत्या रुग्णसंख्येने केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    होळी, ईद, शब-ए-बारात आणि ईस्टरला होणारी गर्दी रोखण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध लादण्याची सूचना केंद्राने केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील काही जिल्हे, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, पंजाबमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे यंदाची होळी घरच्या घरीच साजरी करावी लागणार आहे.