serial rapist taxi driver punishment for 384 years

झारखंडच्या दुमकामध्ये सामूहिक अत्याचार आणि सरायकेला खरसावामध्ये महिलेला निर्वस्त्र केल्याच्या घृणास्पद कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली असतानाच बिहारमध्येही (gang rape in bihar) अशीच एक घटना घडली आहे.

मुजफ्फरपूर : झारखंडच्या दुमकामध्ये सामूहिक अत्याचार आणि सरायकेला खरसावामध्ये महिलेला निर्वस्त्र केल्याच्या घृणास्पद कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली असतानाच बिहारमध्येही (gang rape in bihar) अशीच एक घटना घडली आहे. येथील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एका २७ वर्षीय विवाहित आणि चार मुलांच्या आईवर ५ तरुणांनी सामूहिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस येताच राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी राहुलसिंग, अनिकेतकुमार, निहालसिंग आणि दोन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

दुमका प्रकरणाची चौकशी २ महिन्यात करा

राष्ट्रीय महिला आयोगाने झारखंडच्या दुमका जिल्ह्यात एका महिलेवर १७ मद्यधुंद तरुणांनी केलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी चिंता व्यक्त करीत राज्य पोलिसांना या प्रकरणाची चौकशी २ महिन्याच्या आत करावी, अशी सूचना केली आहे. उल्लेखनीय आहे की, येथे जत्रेहून घरी परत जात असलेल्या ३५ वर्षीय महिलेवर १७ नराधमांनी पतीसमोरच अत्याचार केले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तातडीने बेड्या ठोकण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विधवेला निर्वस्त्र करून गावाबाहेर काढले

दुमकामधील सामूहिक अत्याचारी घटना ताजी असतानाच सरायकेला खरसावा जिल्ह्यातही एक धक्कादायक घटना घडली. येथे एका विधवा महिलेला १०  गावगुंडांनी निर्वस्त्र करून गावाबाहेर काढले. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या नराधमांनी विधवा महिलेला ग्रामस्थांसमोर जबर मारहाण केली आणि निर्वस्त्र केले. ३४ वर्षांच्या पीडित विधवा महिलेने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.