kanupriya

मीडिया क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया (TV Anchor Kanupriya Passes Away) यांचे कोरोनाच्या उपचारा दरम्यान निधन झालं आहे.

    कोरोनामुळे (Coronavirus) संपूर्ण देशाची स्थिती भयानक आहे. कोरोना काळात अनेक दिग्गजांच्या मृत्यूच्या बातम्या कानावर पडत आहेत. अँकर रोहित सरदाना यांच्या निधनानंतर आता मीडिया क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया (TV Anchor Kanupriya Passes Away) यांचे कोरोनाच्या उपचारा दरम्यान निधन झालं आहे.

    कनुप्रिया या अँकर असण्यासोबत उत्तम अभिनेत्रीही होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. तसेच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली. तापही वाढत होता. याच दरम्यान कनुप्रिया यांचं निधन झालं.