bharat biotech vaccine

सीरम इन्स्टिट्युटननंतर(serum institute) आता भारत बायोटेकने(bharat biotech) आपली कोव्हॅक्सिन(covaccine) लसीची पहिली बॅच पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देशातील विविध ठिकाणी पाठवली आहे.

सीरम इन्स्टिट्युटननंतर(serum institute) आता भारत बायोटेकने(bharat biotech) आपली कोव्हॅक्सिन(covaccine) लसीची पहिली बॅच पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देशातील विविध ठिकाणी पाठवली आहे. देशभरातील ११ शहरांमध्ये ही लस पाठवण्यात आली आहे.

भारत बायोटेकने यासंदर्भात ट्विट करुन सांगितले आहे की, “भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीची पहिली बॅच मध्यरात्री १ वाजता विविध शहरांसाठी रवाना झाली. हा परिपूर्ती आणि अभिमानाचा क्षण आहे. देशातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी स्वदेशी लस पूर्णपणे सज्ज आहे”.

सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना भारत सरकारने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणाऱ्या सरकारच्या सार्वजनिक लसीकरणात या दोन लसींचा वापर केला जाणार आहे.

भारत बायोटेकने गनवरम, गुवाहाटी, पटना, दिल्ली, कुरुक्षेत्र, बंगळुरु, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांसाठी बुधवारी पहाटे लसीची पहिली बॅच पाठवली आहे. यातील प्रत्येक व्हायोलमध्ये २० डोस आहेत, असे भारत बायोटेकने आपल्या निवेदनात म्हटले आहे.