१९ जूनच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर, मोदी देशाला संबोधित करणार

भारत आणि चीन यांच्यातील तणाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि चीनला लागून असलेल्या सीमेवरील

भारत आणि चीन यांच्यातील तणाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि चीनला लागून असलेल्या सीमेवरील सध्याची परिस्थिती या संदर्भात येत्या १९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसेच ही बैठक सर्व पक्ष्यांच्या समवेत आणि विचाराने होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत.

दरम्यान,  या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ जूनला देशातील सर्व जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदी काय बोलणार आहेत ? चीनच्या बाबतीत भारताची रणनिती काय असेल ? याविषयी अनेक प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातून समोर येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक राजकीय पक्षांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण नेमकं चाललयं तरी काय ? याबाबत माहिती द्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. 

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले असून, त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत.