ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचाही शिरकाव; ब्लॅक फंगसपेक्षा व्हाईट फंगस जास्त धोकादायक!

बिहारमध्ये व्हाईट फंगसचे (white fungus) चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

    पटना. कोरोना (corona virus) व्हायरसच्या महामारीमुळे मृत्यू तांडव सुरु असतानाच ब्लॅक फंगसने (black fungus) शिरकाव केला. या नव्या आव्हानाला तोंड देत असतानाच आता आरोग्य व्यवस्थेसमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. बिहारमध्ये व्हाईट फंगसचे (white fungus) चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

    नव्याने समोर आलेला विषाणू व्हाईट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगितल्या जात आहे. व्हाईट फंगस हा कोरोनासारखाच फुफ्फुसात संक्रमित होतो. याशिवाय शरीराचे इतर अवयव नख, त्वचा, पोट, किडनी, मेंदू आणि गुप्तांगामध्येसुद्धा संक्रमित होतो.