दिलगिरी : डॉक्टरांविषयीच्या वक्तव्यावरुन सुरू असलेला वाद मिटला; अखेर रामदेवाबाबा एक पाऊल बॅकपुटवर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत.

    नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहून वादग्रस्त विधान मागं घेण्यास सांगितलं होतं. योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळं वाद वाढत होता. दरम्यान या वादाला आता पूर्वविराम मिळाला आहे. योगगुरु रामदेव यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी आपण केलेलं वक्तव्य मागे घेत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालंय. आपण जे स्पष्टीकरण दिलंय तेवढ्यानं वेदना, दु:ख शमणार नाही. या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरु रामदेव बाबांविरोधात कडक पवित्रा घेतला होता.

    असं आहे प्रकरण?

    योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांचं तशी भावना नसल्याचं सांगितलं आहे.

    after the statement about the doctor ramdev baba finally live and tweeted