बुढा होगा तुम्हारा…  वय ६० वर्ष,  पाच मुलांचा बाप अन त्याने दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी विजेच्या खांबावर चढून घातला गोंधळ

द्धाच्या पत्नीचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे वृद्ध सध्या आयुष्यात एकटा पडला आहे आयुष्यातील एकटेपण दूर सारावं यासाठी वृद्धाची दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे. पण त्याच्या कुटुंबाकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने थेट विजेच्या खांब्यावर चढून शोले स्टाईल कुटुंबावर दबाब टाकायचं ठरवलं. त्यानुसार तो विजेच्या खांब्यावर चढला.

    मुंबई : एका ६० वर्षीय माणसाने असे काही केले कि तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्यक्तीने ‘शोले’ चित्रपटात विरु बसंतीसोबत लग्न करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गोंधळ घालतो तशाच गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या ६० वर्षीय वृद्धाला दुसऱ्या लग्न करायचे आहे आणि त्याचा हा हट्ट पुरविण्यात यावा यासाठी त्याने हा गोंधळ घातला आहे.विशेष म्हणजे या वृद्धाला तीन मुलं आणि दोन मुली आहेत.

    राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एक ६० वर्षीय वृद्ध दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी चक्क विजेच्या खांब्यावर पोहोचला. विशेष म्हणजे त्याला तीन मुलं आणि दोन मुली आहेत. या सर्वांचे लग्न झालं आहे. त्यांनादेखील लहान मुलं आहेत. तर वृद्धाच्या पत्नीचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे वृद्ध सध्या आयुष्यात एकटा पडला आहे आयुष्यातील एकटेपण दूर सारावं यासाठी वृद्धाची दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे. पण त्याच्या कुटुंबाकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने थेट विजेच्या खांब्यावर चढून शोले स्टाईल कुटुंबावर दबाब टाकायचं ठरवलं. त्यानुसार तो विजेच्या खांब्यावर चढला.

    वृद्ध ज्यावेळी विजेच्या खांब्यावर चढला त्यावेळी सुदैवाने वीज बंद होती. वृद्ध व्यक्ती विजेच्या पोलवर चढल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण गावात पसरली. याशिवाय महावितरणाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत देखील याबाबतची माहिती पोहोचली. त्यानंतर त्यांनी त्या भागातील इलेक्ट्रिक कनेक्शन कापलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.दरम्यान, गावातील नागरिकांनी वृद्धांची समजूत घातली. गोड बोलून वृद्धाला विजेच्या पोलखाली उतरवलं. हा सर्व प्रकार काही लोकांनी कॅमेऱ्यातही कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.