dr randeep guleria

डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे की, भारतातील काही कोरोना लशींचे काम आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आम्हाला आशा आहे की डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या सुरूवातीपर्यंत त्यापैकी एखाद्याला ड्रग रेग्युलेटरकडून आपत्कालीन मंजुरी मिळेल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल. भारतात सध्या सहा लसींवर काम सुरू आहे.

भारतात कोरोना लशीची वाट पाहणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.  डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीस कोरोना वॅक्सीनला आपत्कालीन मंजुरी(emergency approval to corona vaccine) मिळू शकते. दिल्ली -एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया(randeep guleria) यांनी ही माहिती दिली आहे.

डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे की, भारतातील काही लशींचे काम आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आम्हाला आशा आहे की डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या सुरूवातीपर्यंत त्यापैकी एखाद्याला ड्रग रेग्युलेटरकडून आपत्कालीन मंजुरी मिळेल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल. भारतात सध्या सहा लसींवर काम सुरू आहे. यात ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि भारत बायोटेक लस फेज-३ ट्रायल्समध्ये आहेत.

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीन-कोवीशील्डच्या फेज -३ च्या क्लिनिकल ट्रायल्सचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर आले आहेत. हे भारतात बनवत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ पूनावाला यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की ते तातडीच्या मंजुरीसाठी लवकरच अर्ज करण्याची तयारी करत आहेत.

डॉ. गुलेरिया यांनी गुरुवारी सांगितले की, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे समोर आले आहे. या लसीच्या सेफ्टीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ७० ते ८० हजार स्वयंसेवकांना लसी देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.