केरळच्या कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचं विमान कोसळलं ; वैमानिकासह १४ जण ठार

कोझीकोडः  केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान (AIR INDIA Express Plane) घसरलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , या घटनेत वैमानिकाचा को-वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. या विमानात १९१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून हे विमान कालिकत येथे आलं होतं. केरळमधील या विमान अपघातात १४ जण ठार तर १२३ जखमी झाले आहेत. १५ जणांचीप्रकृती गंभीर आहे, अशी माहिती मलप्पूरमच्या पोलीस अधीक्षकांनी दिलीय.याबाबत  एएनआयने हे वृत्त दिलं आहे  अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.

एअर इंडियाच्या दुबई-कोझीकोड (IX-1344)) या विमानाला मोठा अपघात झाला आहे. विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. केरळमध्ये कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँड करत असतानाच ही घटना घडली. धावपट्टीवरुन हे विमान घसरलं आणि एका छोट्या दरीत कोसळलं.दरम्यान या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.