अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? योगी आदित्यनाथ म्हणतात की…

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं शनिवारी निधन झालं. मुख्यमंत्री योगी आदिन्यानाथनी श्रद्धांजली वाहिली आणि अलिगढ विमानतळाला कल्याण सिंग यांचं नाव देण्यात येण्याचं सांगितलं आहे. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर, अलीगढमधील भाजप नेत्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या मिनी विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

  नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं शनिवारी निधन झालं. मुख्यमंत्री योगी आदिन्यानाथनी श्रद्धांजली वाहिली आणि अलिगढ विमानतळाला कल्याण सिंग यांचं नाव देण्यात येण्याचं सांगितलं आहे. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर, अलीगढमधील भाजप नेत्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या मिनी विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

  योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले?

  योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितलं कि, ““आज, आम्ही कल्याण सिंह यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अलीगढच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये आणले आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहता यावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कल्याण सिंह वर्षानुवर्षे अलीगढच्या लोकांशी जोडले गेले होते.”, असे आदित्यनाथ म्हणाले आहेत.

  दरम्यान “कल्याण सिंह कट्टर रामभक्त म्हणून ओळखले जातात. विमानतळापासून अलिगढपर्यंत उत्तर प्रदेशातील लोकांचा त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भगवान रामाने आम्हाला शक्ती प्रदान करावी, अशी मी प्रार्थना करतो,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

  यावेळी अलीगढ विमानतळाला कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येईल का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, “याबद्दल चर्चा करण्यासाठी लवकरच आम्ही कॅबिनेट बैठक घेणार आहोत. कल्याण सिंह यांनी मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशमधील गरीब जनतेसाठी अनेक विकासकामे केली. ते कोणत्याही एका विशिष्ट जात किंवा समुदायाचे नेते नव्हते,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

  झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का?

  तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. युथ काँग्रेसचे श्रीनिवास बीव्ही यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे.भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान? अशी विचारणा युथ काँग्रेसने ट्विटरवरुन केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्याच्या वरती झेंडा. भाजपा नेहमीप्रमाणे..कोणतीही खंत, पश्चात्ताप, खेद, दु:ख नाही अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.