रुग्णांना दिलासा, अल्झायमरवर पहिल्यांदाच मिळालं औषध; Aduhelm ला FDA ची मंजुरी

११५ वर्षांपूर्वी जर्मन मानसरोगतज्ज्ञ एलोइस अल्जाइमर (German psychiatrist Eloise Alzheimer's) यांनी हा आजार शोधला होता. हा एक मेंदू विकार आहे. यामुळे हळूहळू स्मरणशक्ती (Memory) आणि विचार करण्याची क्षमता नष्ट व्हायला लागते.

    दिल्ली : अमेरिकेच्या (American food and drug administration) फुड ऍन्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने अल्झायमर (Alzheimers) या आजारावर उपचार करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एडूहेल्म (Aduhelm) नावाच्या औषधाला सशर्त मंजुरी दिलेली आहे. दोन दशकांपासून या आजारावरील औषधाची रुग्ण वाट पाहत होते.

    अमेरिकेने पहिल्यांदाच अल्झायमरवरील Aduhelm नावाच्या औषधाला परवानगी दिलेली आहे. बायोजनकडून विकसित करण्यात आलेलं एडूहेल्म हे अल्झायमर आजारावर मंजुरी मिळालेलं पहिलं आणि २००३ नंतर पहिल्यांदा उपचारात येणारे औषध आहे. त्यामुळे जगभरातल्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

    ११५ वर्षांपूर्वी जर्मन मानसरोगतज्ज्ञ एलोइस अल्जाइमर (German psychiatrist Eloise Alzheimer’s) यांनी हा आजार शोधला होता. हा एक मेंदू विकार आहे. यामुळे हळूहळू स्मरणशक्ती (Memory) आणि विचार करण्याची क्षमता नष्ट व्हायला लागते. तरीदेखील अल्जाइमर सारख्या आजाराची सगळी कारणं शोधण्यात अद्यापही हवं तेवढे यश आलेलं नाही.

    एडूहेल्म हे अल्झायमर रोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारं एक प्रातिनिधिक औषध आहे. बायोजन ही केंब्रिज मधील बायोटेक्नोलॉजी फर्म आहे. जपानी कंपनी ईसाई आणि बायोजन यांनी हे औषध विकसित केलं आहे.

    अशी मिळाली परवानगी

    एफडीएनुसार ३,४८२ रुग्णांवर प्रातिनिधिक स्वरूपात तीन वेगवेगळ्या पद्धतीने या औषधांच्या परिणामांचा अभ्यास केल्यानंतर या औषधाला परवानगी देण्यात आलेली आहे. एफडीए सेंटर फॉर ड्रग इव्होल्युशनचे डिरेक्टर डॉक्टर पॅट्रीजिया केवाजोनी यांच्यामते, एडूहेल्म औषधाला मंजुरी देताना अनेक पद्धतीने चर्चा आणि अभ्यास करण्यात आलेला आहे.

    alzheimers first new drug aduhelm medicine approved by amirican fda