amarnath yatra

अमरनाथ यात्रा (amarnath pilgrimage date)२८ जून २०२१ रोजी सुरू होणार आहे. तसेच २२ ऑगस्ट २०२१ रोजी या यात्रेचा शेवट होणार आहे. यावर्षी ही यात्रा ५६ दिवस असणार आहे.

    मुंबई : अमरनाथ यात्रेसाठी(amarnath yatra) ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा (amarnath pilgrimage date)२८ जून २०२१ रोजी सुरू होणार आहे. तसेच २२ ऑगस्ट २०२१ रोजी या यात्रेचा शेवट होणार आहे. यावर्षी ही यात्रा ५६ दिवस असणार आहे. अमरनाथ देवस्थान बोर्डाचे चेअरमन आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी राजभवनात सकाळी बोर्डाच्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २ वर्षांमध्ये अमरनाथ यात्रेचा कालावधी पूर्णपणे उपलब्ध झाला नव्हता. गेल्या वर्षी तर कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना अमरनाथला दर्शनासाठी जाता येणार आहे. आज अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

    अमरनाथ यात्रेचा कालावधी ५६ दिवसांचा आहे. अमरनाथ यात्रेच्या नोंदणीसाठी १ एप्रिलपासून फॉर्म उपलब्ध होईल. यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ आणि आयटीबीपी जवानांना देण्यात आली आहे.