Viral Photo अद्भुत : युपीतल्या या बोकडाच्या शरीरावर लिहिलंय ओम- मोहम्मद, मालकाने ठेवलेली किंमत ऐकून चक्रावून जाल

बोकडाच्या डाव्या बाजूवर ओम लिहिलेलं असून उजवीकडे मोहम्मदचे निशाण आहे. बोकडाच्या शरीरावर तयार झालेली ही नैसर्गिक निशाणी पाहून लोकं हैराण होत आहेत. काहीजण त्याला विकत घेण्यासाठीही येत आहेत.

  उत्तर प्रदेश : जनावराच्या शरीरावर एखाद्याच्या हाताने नाव लिहिणं ही सामान्य गोष्ट आहे. पण ज्या बकरीविषयी आम्ही सांगणार आहोत तिच्या शरीरावर जन्मापासूनच ओम-मोहम्मद नाव लिहिलं आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एक बोकड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चर्चेचं कारण असं आहे की, बोकडाच्या शरीरावर एका बाजूला ‘ओम’ आणि दुसऱ्या बाजूला ‘मोहम्मद’ लिहिलेलं दिसत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. एवढंच नाही तर याची किंमतही लाखोंच्या घरात गेली आहे.

  बोकडावर आहे नैसर्गिक निशाण

  वास्तविक हे प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील गजरौला येथील आहे. न्यूज १८ च्या एका अहवालानुसार, गजरौलातील ख्याली पूर गावातून हे हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. या बोकडाविषयी ऐकून लोकं दूर-दूर वरून याला पाहण्यासाठी येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, बोकडाच्या डाव्या बाजूवर ओम लिहिलेलं असून उजवीकडे मोहम्मदचे निशाण आहे. बोकडाच्या शरीरावर तयार झालेली ही नैसर्गिक निशाणी पाहून लोकं हैराण होत आहेत. काहीजण त्याला विकत घेण्यासाठीही येत आहेत. अहवालानुसार, बोकडाचा मालक ताराचंदने अधिक किंमत मिळावी म्हणून सोशल मीडियावर आपला मोबाईल नंबरही पोस्ट केला आहे, कारण कोणालाही त्याच्यापर्यंत पोहोचण्यात काहीही अडचण येऊ नये.

  मालकाने ठेवलीये ११ लाख किंमत

  बोकडाची किंमत एक लाख रुपये ठेवली असल्याची माहिती गावतील लोकांनी दिली पण ताराचंदने ११ लाख रुपये विक्रीची किंमत आहे असं सांगण्यात येत आहे. तथापि याची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातीलच नव्हे तर दिल्ली पर्यंतचे खरेदीदार या गावात दाखल झाले आहेत. बकरी ईद जवळ येताच बोकडांचे भाव गगनाला भिडतात. या सगळ्यात हा बोकड जबदस्त चर्चेचा विषय ठरतो आहे. आता याच्या विक्रीचे किती रुपये मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  amazing om mohammed is written on the body of this goat of up the owner has kept the price of so many lakhs rupees