अंबानी परिवारातर्फे चारधाम बोर्डाला पाच कोटी रुपयांची देणगी

देहरादून : कोविड -१९ साथीच्या आजारामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबीयांनी उत्तराखंड येथील ‘चारधाम देवस्थानम बोर्डा’ला पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे माजी सदस्य अनंत अंबानी यांनी कोरोना काळातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चारधाम बोर्डाला पाच कोटी रुपये दिले आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबातील अन्य सदस्य चारधाम येथे नियमितपणे भेट देतात. यापूर्वी त्यांनी या धमांसाठी कोट्यवधी रुपये दान केले आहेत. देवस्थानम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमण आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. सिंह यांनी या देणगीबद्दल आंबानी परिवाराचे आभार मानले आहेत.