संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…

देशात पुन्हा लॉकडाउन(lockdown) लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे(corona second wave) आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.  देशात पुन्हा लॉकडाउन(lockdown) लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

    अमित शाह यांनी एका मुलाखतीत बोलताना कोरोनासह देशातील विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली.  शाह म्हणाले,“केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वीच राज्यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. लॉकडाऊनसारखे उपाय राज्यांना आपापल्या पातळीवर घ्यावे लागतील. कारण प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्यांनीच स्वतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणं योग्य राहिल.

    गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्रानं करोनाशी लढा देण्यासाठी मुलभूत सुविधा उभारल्या असल्याचं सांगत शाह यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळली आहे.

    शाह म्हणाले,कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही कमी आहे. दुसरी लाट फक्त भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये आलेली आहे. करोनाविरोधी लढाईलाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम आहे,” असं अमित शाह यांनी सांगितलं.

    कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही करोनासंदर्भातील नियम पाळल्याचं दिसून आलं नाही. असं वागणं चुकीचं असल्याचही शाह यांनी स्पष्ट केलं.तसेच दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आपण नक्की जिंकू असा आत्मविश्वासही शाह यांनी व्यक्त केला.