
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक(twitter account block) केल्यामुळे ट्विटरला संसदीय समितीच्या रोषाला सामोरे जावे लागले. नोव्हेंबर महिन्यात गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक का केले ? असा प्रश्न संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीने टि्वटरला विचारला. यावर उत्तर देताना ट्विटरने ‘कॉपीराईट’चे कारण दिले.
दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक(twitter account block) केल्यामुळे ट्विटरला संसदीय समितीच्या रोषाला सामोरे जावे लागले. नोव्हेंबर महिन्यात गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक का केले ? असा प्रश्न संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीने टि्वटरला विचारला. यावर उत्तर देताना ट्विटरने ‘कॉपीराईट’चे कारण दिले. गृहमंत्री शाह यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोच्या कॉपीराईट प्रकरणामुळे आम्हाला त्यांचे खाते तात्पुरते बंद करावे लागले, असे उत्तर ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला दिले.
फेसबुक आणि टि्वटरच्या अधिकाऱ्यांना संसदीय समितीच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या स्थायी समितीने नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण, सोशल मीडियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि डिजीटल जगतात महिलांच्या सुरक्षेवरुन फेसबुक, टि्वटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात शाह यांचे अकाऊंट बंद झाल्यानंतर टि्वटरने स्पष्टीकरण देत, हे तांत्रिक कारणामुळे झाले असून त्यात सुधारणा केल्याचे म्हटले होते. यावेळी समितीतील एका सदस्याने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दलही टि्वटरला प्रश्न विचारला. शहा यांचे टि्वटर अकाऊंट बंद करण्यासाठी त्यांना कोणी आदेश दिला होता का? असा सवालही विचारण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.