Ammunition seized in truck

सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “संयुक्त कारवाईत कुलगाम जिल्ह्यातील जवाहर बोगद्याजवळ मंगळवारी मध्यरात्री दोन संशयितांना अटक करण्यात आली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील (Jammu-Srinagar highway) जवाहर बोगद्याजवळ ट्रकमधून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त झाल्यानंतर (Ammunition seized ) सुरक्षा दलाने दोन जणांना अटक केली आहे. सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “संयुक्त कारवाईत कुलगाम जिल्ह्यातील जवाहर बोगद्याजवळ मंगळवारी मध्यरात्री दोन संशयितांना अटक करण्यात आली.”

ते म्हणाले की सुरक्षा दलांना एक ए.के रायफल, दोन मैगजीन, चीनच्या बनावटीच्या सहा बंदुका रायफल, तीन मैगजीन आणि एक एम ४ यूएस कार्बाईन आणि १२ मैगजीन जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की ट्रक जम्मू भागातील अखनूरहून दरीकडे येत होता.