VIDEO : हा जवान वृद्धाला खांद्यावर उचलून घेऊन निघाला होता; कारण ऐकून तुमचीही छाती गर्वाने फुलून येईल

जगभरात भारतीय जवान आपल्या शौर्याबद्दल चर्चेत असतात. मात्र, अनेकदा अशा घटनाही पाहायला मिळतात ज्या थेट लोकांचं मनं जिंकतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहूनही तुम्हाला असंच वाटेल. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक पोलीस अधिकारी आपल्या पाठीवर एका वृद्धावर घेऊन डोंगरांच्या मधून चालला आहे.

    नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात आहे. अनेक प्रयत्न करूनही कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी लसीकरणाचा (Corona Vaccination) वेगही वाढवण्यात आला आहे. या दरम्यान सोशल मीडियावर (Social Media) लसीकरण करतानाचेही काही मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ मात्र आपलं मन जिंकतात. सध्या जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ लोकांचं मन जिंकत आहे. इतकंच नाही तर लोक जवानांचं (Viral Video of Cop) प्रचंड कौतुकही करत आहेत.

    जगभरात भारतीय जवान आपल्या शौर्याबद्दल चर्चेत असतात. मात्र, अनेकदा अशा घटनाही पाहायला मिळतात ज्या थेट लोकांचं मनं जिंकतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहूनही तुम्हाला असंच वाटेल. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक पोलीस अधिकारी आपल्या पाठीवर एका वृद्धावर घेऊन डोंगरांच्या मधून चालला आहे. या व्यक्तीला कोरोना लस देण्यासाठी नेलं जात असल्याचं समोर आलं आहे. या अधिकाऱ्याचं नाव मोहन सिंग असून अब्दुल गनी (Abdul Gani) या ७२ वर्षीय वृद्धाला ते लस देण्यासाठी घेऊन जात आहेत.

    या व्हिडिओनं नक्कीच तुमचंही मन जिंकलं असेल. ट्विटरवर हा व्हिडिओ केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, की SPO मोहन सिंह यांच्यावर आम्हाला गर्व आहे. Reasi जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ते या वृद्ध व्यक्तीला मदत करत आहेत. हा व्हिडिओ सहा हजाराहून अधिकांनी पाहिला आहे. लोकांच्या हा व्हिडिओ पसंतीस उतरत असून नेटकऱ्यांनी या जवानाचं भरपूर कौतुकही केलं आहे. एका युजरनं लिहिलं, की देशाची अशाप्रकारे मदत करणं एक महान काम असून आम्हाला या जवानावर गर्व आहे.

    an elder man soldier carried on his shoulder to get him vaccinated video viral