गेल्या २४ तासांत देशात ५५ हजार ७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

  • आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. तर १० लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ५ लाख ४५ हजार ३१८ इतके कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ३५ हजार ७४७ इतक्या कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे.

देशभरात कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत पुन्हा एकदा नव्याने भर झालेली पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ५५ हजार ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या वर गेली आहे. तर चिंताजनक म्हणजे गेल्या २४ तासांत देशात ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. तर १० लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ५ लाख ४५ हजार ३१८ इतके कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ३५ हजार ७४७ इतक्या कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे.

देशात काल गुरूवारी पहिल्यांदाच ५० हजारांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच ५२ हजार १२३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली होती. परंतु आज ही रूग्णसंख्या १६ लाखांच्या वर गेली आहे. त्यामुळे मागील २४ तासांत देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.