देशात गेल्या २४ तासांत ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

  • गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत ३८ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन ऑगस्टपर्यंत देशात २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोरोना चाचणी झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ५२ हजार ९७२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे.  तसेच देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत ७७१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.   

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत ३८ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन ऑगस्टपर्यंत देशात २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोरोना चाचणी झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. 

दरम्यान, संपूर्ण देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ९ हजार ५०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ हजार ५७६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूसारख्या राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.